आजी आजोबा पूजन - एक अनोखा उपक्रम

17 Aug 2023 11:58:16

' आजी आजोबा पुजन ' -  प्रा.म.ना.अदवंत विद्यामंदिरचा अनोखा उपक्रम 


आजी आजोबा पूजन  
आजी आजोबांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आपल्या शाळेत ‘आजी-आजोबा पूजन’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी गुरुवार,दि.१७/०८/२०२३ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या तळमजल्यावर करण्यात आले होते. आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपकार्याध्यक्षा मा.श्रीमती. विद्याताई कुलकर्णी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. आजपासून विद्यार्थिनींसाठी शाळेमध्ये नवीन संगणक कक्षाचीही सुरुवात करण्यात आली. तसेच विद्यार्थिनींसाठी ‘माझे वाचनालय’ या उपक्रमचे उद्घाटन करण्यात आले.

प्रथम ईशस्तवन,स्वागतगीत व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती. मीनाताई गोसावी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व आजी-आजोबांचे स्वागत करून शाळेत सुरु असलेल्या विविध उपक्रमबद्दल सर्वाना माहिती दिली. शाळेतील शिक्षिका श्रीमती.गौरी काटकर यांनी मान्यवारांचा परिचय करून दिला. त्यानंतर मा. मुख्याध्यापिकांनी आलेल्या मान्यवरांचे फुलांचे रोप देऊन स्वागत केले.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी व विद्यार्थिनींचे आजी आजोबा तसेच शाळेचे सर्व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थिनीना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी ‘माझे वाचनालय’ या नवीन उपक्रमाचे उद्घाटन मा.श्रीमती.विद्याताई कुलकर्णी याच्या हस्ते करण्यात आले. यानंतर महत्त्वाच्या अशा आजी – आजोबा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आल्या. शाळेतील विद्यार्थिनीनी आजी-आजोबांचे औक्षण केले. त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांना एक स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या कवितेचे कार्ड दिले व त्यांचे आशीर्वाद घेतले. हा असा नाविन्यपूर्ण उपक्रम शाळा राबवीत आहे याबद्दल आजी-आजोबांनी आनंद व्यक्त केला. तसेच सर्वाना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वाना अल्पोपहार देण्यात आला. शाळेतील शिक्षिका श्रीमती. जुलेखा शेख यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. श्रीमती. भारती झेंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Powered By Sangraha 9.0