शाळेविषयी
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारात असलेली प्रा.म.ना.अदवंत प्राथमिक विद्यामंदिर या शाळेची स्थापना ११ जून १९९१ रोजी 'नवीन मराठी शाळा' या नावाने झाली. ई. १ ली ते ४ थी पर्यंत असलेल्या या शाळेला सन २००१ मध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्रा.महादेव नामदेव अदवंत यांचे नाव शाळेस देण्यात आले.
मुलींना उत्तम शिक्षण व संस्कार देणारी एक नामांकित शाळा म्हणून प्रा.म.ना.अदवंत प्राथमिक विद्यामंदिर पुण्यात प्रसिध्द आहे.